• HOME
  • INDIA
  • GUJRAT
  • Entertainment
  • Lifestyle
  • Lok Sabha
  • પત્રકાર બનો
Sunday, November 22, 2026
Satya Samachar
  • Login
  • HOME
  • INDIA
  • GUJRAT
  • Entertainment
  • Lifestyle
  • Lok Sabhaચૂંટણી
  • પત્રકાર બનોઓફર
No Result
View All Result
  • HOME
  • INDIA
  • GUJRAT
  • Entertainment
  • Lifestyle
  • Lok Sabhaચૂંટણી
  • પત્રકાર બનોઓફર
No Result
View All Result
Satya Samachar
No Result
View All Result

मराठी नाटकाची तिसरी घंटा आता नेहरू सेंटरमध्ये

satyasamachar by satyasamachar
November 20, 2026
in GUJARAT
Reading Time: 1 min read
A A
0
मराठी नाटकाची  तिसरी घंटा आता नेहरू सेंटरमध्ये
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा पुढाकार!

આ પણ વાંચો ટ્રેન્ડિંગ સમાચાર

જામનગરનું આકાશ ગુંજયું.. ભારતીય વાયુસેના દ્વારા ‘સહાયતા સેતુ – 2026’ નું સફળ આયોજન સાથે ભવ્ય સમાપન

જામનગરનું આકાશ ગુંજયું.. ભારતીય વાયુસેના દ્વારા ‘સહાયતા સેતુ – 2026’ નું સફળ આયોજન સાથે ભવ્ય સમાપન

Himesh Reshammiya Cheers for Gujarati comedy ‘Ruff and Tuff Kanya’, Extends His Best Wishes to the T…

Himesh Reshammiya Cheers for Gujarati comedy ‘Ruff and Tuff Kanya’, Extends His Best Wishes to the T…

Mitwa’ singer Shafqat Amanat Ali Opens Up About Return to Stage & Recordings After Year-Long Battle …

Mitwa’ singer Shafqat Amanat Ali Opens Up About Return to Stage & Recordings After Year-Long Battle …

Load More

मराठी रंगभूमीला अधिक व्यापक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी मुंबईतील नेहरू सेंटरने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. व्यावसायिक आणि प्रायोगिक अशा दोन्ही प्रकारच्या मराठी नाटकांना मुंबईतील नामांकित सांस्कृतिक केंद्र असलेल्या नेहरू सेंटरमध्ये सादरीकरणाची संधी मिळावी, या उद्देशाने हा विशेष उपक्रम सुरू करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत रविवारच्या नाट्यप्रयोगांसाठी मराठी नाट्यनिर्मात्यांना सवलतीच्या दरात नेहरू सेंटरचे नाट्यगृह उपलब्ध करून दिले जाणार आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद विशेष प्रयत्नांतून नेहरू सेंटर व्यवस्थापनाला  बहुमोल सहकार्य करणार आहे. या उपक्रमामुळे मराठी रंगभूमीला नवी ऊर्जा मिळण्यासोबतच मराठी नाटकांना अधिक व्यापक प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचण्याची संधी मिळणार आहे. तसेच नव्या प्रेक्षकांना मराठी रंगभूमीकडे आकर्षित करण्यासही या उपक्रमाची मदत होणार आहे. या उपक्रमाची सविस्तर माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

नेहरू सेंटरचे कामकाज पाहणारे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नितीन करीर यांनी यावेळी या उपक्रमामागील भूमिका स्पष्ट केली. नेहरू सेंटरमध्ये आजवर मराठी, हिंदी आणि इंग्रजीसह विविध भाषांतील सांस्कृतिक कार्यक्रम आणि नाट्यप्रयोग होत आले आहेत. हिंदी आणि गुजराती नाटकांचे प्रयोगही येथे नियमितपणे सादर होतात. मात्र, मराठी नाटकांनाही या प्रतिष्ठित व्यासपीठावर अधिकाधिक संधी मिळावी, अशी नेहरू सेंटर व्यवस्थापनाची इच्छा आहे. यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेला पुढाकार घेण्याची विनंती करण्यात आली.

नितीन  करीर म्हणाले, “नेहरू सेंटर हे केवळ नाट्यप्रयोगांसाठी उपलब्ध करून देणारे ठिकाण न राहता एक महत्त्वाचे सांस्कृतिक  केंद्र म्हणून विकसित व्हावे, असा आमचा प्रयत्न आहे. देशभरात उत्तम काम करणाऱ्या नाट्यसंस्था, कलाकार आणि नाट्यनिर्मात्यांना प्रोत्साहन देण्याची आमची भूमिका आहे. मराठी रंगभूमीवरील दर्जेदार व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटकांना येथे सादरीकरणाची संधी मिळावी, यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे. ही  केवळ सुरुवात असून, प्रेक्षकांचा उत्तम  प्रतिसाद मिळाल्यास भविष्यात त्याचा विस्तार करण्याचा आमचा मानस आहे.

या उपक्रमाची सुरुवात दर रविवारी दुपारी ३.३० वाजता मराठी नाटकांचे प्रयोग आयोजित करण्यापासून झाली आहे. सुरुवातीला केवळ रविवार दुपारच्या प्रयोगांवर भर दिला जाणार असून, या प्रयोगांना मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन आठवड्यातील इतर दिवशीही नाटकांचे प्रयोग आयोजित करण्याचा विचार आहे. आगामी प्रयोगांचे वेळापत्रकही निश्चित करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, या उपक्रमांतर्गत ‘ही दोस्ती तुटायची नाही’ या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला. आगामी रविवारच्या प्रयोगांचेही नियोजन झाले असून, आगामी काळात ‘पुढच्या शुक्रवारी सात वाजता’, ‘भूमिका’, ‘जर तरची गोष्ट’, ‘काटकोन त्रिकोण’,.आमने सामने आणि ‘मराठी बाणा’ यांसारख्या नाटकांचे प्रयोग नेहरू सेंटरमध्ये रंगणार आहेत. आगामी काळात प्रेक्षकांचा प्रतिसाद लक्षात घेऊन आठवड्यातील इतर दिवशीही मराठी नाटकांचे प्रयोग आयोजित करण्याचा विचार आहे.

मराठी नाट्यनिर्मात्यांसाठी रविवारचा दिवस हा नेहमीच महत्त्वाचा असतो. मात्र, या दिवशी नाट्यगृह उपलब्ध होणे अनेकदा कठीण जाते. ही अडचण लक्षात घेऊन नेहरू सेंटर व्यवस्थापनाने मराठी नाट्यनिर्मात्यांसाठी नाट्यगृह सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमात व्यावसायिक आणि प्रायोगिक अशा दोन्ही प्रकारच्या नाटकांचा समावेश असेल. केवळ लोकप्रिय व्यावसायिक नाटकांपुरते मर्यादित न राहता, आशयघन आणि वेगळे प्रयोग करणाऱ्या नाटकांनाही प्रोत्साहन दिले जाणार आहे. मराठी नाट्यविश्वातील विविध संस्था, कलाकार आणि निर्माते यांना एकत्र आणून त्यांच्या कलाकृतींना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद करणार आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह अजित भुरे यांनी मराठी नाटकांसाठी नेहरू सेंटरसारखे प्रतिष्ठित व्यासपीठ उपलब्ध होण्याचे महत्त्व अधोरेखित केले. “एक कलाकार आणि नाट्यनिर्माते म्हणून नाट्यप्रयोग सादर करण्यासाठी चांगले व्यासपीठ मिळणे किती महत्त्वाचे असते, याची मला जाणीव आहे. नेहरू सेंटरसारख्या प्रतिष्ठित ठिकाणी मराठी नाटकांना संधी मिळणे ही आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. आमच्या नाटकांच्या प्रयोगांना मराठी प्रेक्षकांसोबतच अमराठी प्रेक्षकांचाही प्रतिसाद मिळू शकतो. त्यामुळे मराठी रंगभूमीनेही या संधीचे स्वागत करून दर्जेदार प्रयोग प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले पाहिजेत. हे आव्हान दोन्ही बाजूंनी सांभाळण्याची गरज आहे.”

नाट्यप्रयोगांबरोबरच नाट्यविषयक इतर उपक्रमांनाही या व्यासपीठावर स्थान मिळणार आहे. ‘आविष्कार’ संस्थेसोबत सहकार्य करून नाट्यवाचन, कार्यशाळा आणि विविध सांस्कृतिक उपक्रम आयोजित करण्याचे नियोजन आहे. तसेच इतर भारतीय भाषांमधील नाटकांचाही समावेश व्हावा, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. मराठी नाट्यचळवळीला चालना देण्याबरोबरच नाट्यनिर्मितीच्या क्षेत्रातही योगदान देण्याची नेहरू सेंटर व्यवस्थापनाची तयारी आहे. एनसीपीएच्या धर्तीवर निर्मिती क्षेत्रातही पुढाकार घेण्याचा विचार असून, देशभरात उत्तम प्रतिसाद मिळणाऱ्या दर्जेदार नाटकांना प्रोत्साहन देण्याचा मानस आहे. नाट्यगृह उपलब्ध करून देण्यापलीकडे जाऊन नाट्यनिर्मिती, नाट्यसंस्था आणि कलाकारांना आवश्यक सहकार्य करण्यावर भर दिला जाणार आहे. यासाठी विविध नाट्यप्रयोग, महोत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. केवळ महोत्सवांपुरते मर्यादित न राहता वर्षभर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रेक्षकांना नाट्यसंस्कृतीशी जोडण्याचा विचार आहे.

मराठी रंगभूमीला नवे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा नेहरू सेंटर व्यवस्थापनाचा हा उपक्रम केवळ नाट्यप्रयोगांच्या संधीपुरता मर्यादित नाही, तर नाट्यनिर्माते, कलाकार, संस्था आणि प्रेक्षक यांच्यातील दुवा अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद, नाट्यसंस्थांचे सहकार्य आणि कलाकारांचा सहभाग मिळाल्यास या उपक्रमाचा विस्तार करून मराठी रंगभूमीला नवी दिशा मिळू शकते.

मराठी नाटकांना सन्मानाचे व्यासपीठ, निर्मात्यांना प्रयोगांसाठी अनुकूल संधी आणि प्रेक्षकांना दर्जेदार नाट्यप्रयोगांची मेजवानी देण्याच्या दिशेने नेहरू सेंटरने टाकलेले हे पाऊल मराठी रंगभूमीसाठी निश्चितच आशादायी ठरणार आहे.

<a href=

<p>The post मराठी नाटकाची तिसरी घंटा आता नेहरू सेंटरमध्ये first appeared on gandhinagarmetro.com.</p>

Next Post
UNEXPECTED – SAFED SACH’ का फर्स्ट लुक पोस्टर रिलीज़, देहरादून ISBT रेप केस से प्रेरित फिल्म में संज…

UNEXPECTED – SAFED SACH’ का फर्स्ट लुक पोस्टर रिलीज़, देहरादून ISBT रेप केस से प्रेरित फिल्म में संज...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
16 નવી સરકારી કોલેજો બનવાથી ગુજરાતમાં આર્ટ્સ, સાયન્સ, કોમર્સની 3000 જેટલી બેઠકો વધશે | gujarat gover…

16 નવી સરકારી કોલેજો બનવાથી ગુજરાતમાં આર્ટ્સ, સાયન્સ, કોમર્સની 3000 જેટલી બેઠકો વધશે | gujarat gover…

23 Celebrity Tweets You Missed From The Golden Globes

’25 દિવસથી બોટ પર જીવન ગુજારી રહ્યા છે…’, ઈરાનમાં ફસાયેલા ગુજરાતના 72 માછીમારોએ પરત લાવવા સરકારને …

’25 દિવસથી બોટ પર જીવન ગુજારી રહ્યા છે…’, ઈરાનમાં ફસાયેલા ગુજરાતના 72 માછીમારોએ પરત લાવવા સરકારને …

20 લાખના મેફેડ્રોન સાથે ઝડપાયેલા આરોપીને 12 વર્ષની સખ્ત કેદની સજા | Accused caught with 20 lakhs wor…

20 લાખના મેફેડ્રોન સાથે ઝડપાયેલા આરોપીને 12 વર્ષની સખ્ત કેદની સજા | Accused caught with 20 lakhs wor…

ગુજરાત પેટાચૂંટણીમાં ભાજપે વિપક્ષમાંથી આવેલા તમામ ને મેદાને ઉતાર્યા

ગુજરાત પેટાચૂંટણીમાં ભાજપે વિપક્ષમાંથી આવેલા તમામ ને મેદાને ઉતાર્યા

Sleep Study Unveils New Insights

કોંગ્રેસના બેન્ક ખાતા નહીં પણ ભારતની લોકશાહી સીઝ કરી લીધી છે…:  રાહુલ ગાંધી

કોંગ્રેસના બેન્ક ખાતા નહીં પણ ભારતની લોકશાહી સીઝ કરી લીધી છે…: રાહુલ ગાંધી

Tech Giants Unite for Sustainability

જામનગરનું આકાશ ગુંજયું.. ભારતીય વાયુસેના દ્વારા ‘સહાયતા સેતુ – 2026’ નું સફળ આયોજન સાથે ભવ્ય સમાપન

જામનગરનું આકાશ ગુંજયું.. ભારતીય વાયુસેના દ્વારા ‘સહાયતા સેતુ – 2026’ નું સફળ આયોજન સાથે ભવ્ય સમાપન

Himesh Reshammiya Cheers for Gujarati comedy ‘Ruff and Tuff Kanya’, Extends His Best Wishes to the T…

Himesh Reshammiya Cheers for Gujarati comedy ‘Ruff and Tuff Kanya’, Extends His Best Wishes to the T…

Mitwa’ singer Shafqat Amanat Ali Opens Up About Return to Stage & Recordings After Year-Long Battle …

Mitwa’ singer Shafqat Amanat Ali Opens Up About Return to Stage & Recordings After Year-Long Battle …

DOSS MUSIC HOSTS GRAND STAR-STUDDED LAUNCH OF “MISS UNIVERSE” IN MUMBAI!

DOSS MUSIC HOSTS GRAND STAR-STUDDED LAUNCH OF “MISS UNIVERSE” IN MUMBAI!

Recent News

Youtube

  • 16 નવી સરકારી કોલેજો બનવાથી ગુજરાતમાં આર્ટ્સ, સાયન્સ, કોમર્સની 3000 જેટલી બેઠકો વધશે | gujarat gover…

    16 નવી સરકારી કોલેજો બનવાથી ગુજરાતમાં આર્ટ્સ, સાયન્સ, કોમર્સની 3000 જેટલી બેઠકો વધશે | gujarat gover…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 23 Celebrity Tweets You Missed From The Golden Globes

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ’25 દિવસથી બોટ પર જીવન ગુજારી રહ્યા છે…’, ઈરાનમાં ફસાયેલા ગુજરાતના 72 માછીમારોએ પરત લાવવા સરકારને …

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 20 લાખના મેફેડ્રોન સાથે ઝડપાયેલા આરોપીને 12 વર્ષની સખ્ત કેદની સજા | Accused caught with 20 lakhs wor…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 13 વર્ષ સુધી કોમામાં રહ્યા બાદ હરીશ રાણાએ દુનિયાને અલવિદા કહ્યું, ઈચ્છામૃત્યુની મંજૂરી બાદ AIIMSમાં …

    0 shares
    Share 0 Tweet 0
જામનગરનું આકાશ ગુંજયું.. ભારતીય વાયુસેના દ્વારા ‘સહાયતા સેતુ – 2026’ નું સફળ આયોજન સાથે ભવ્ય સમાપન
GUJARAT

જામનગરનું આકાશ ગુંજયું.. ભારતીય વાયુસેના દ્વારા ‘સહાયતા સેતુ – 2026’ નું સફળ આયોજન સાથે ભવ્ય સમાપન

જામનગર સંજીવ રાજપૂત, એબીએનએસ, ભારતીય વાયુસેના દ્વારા હેડક્વાર્ટર ઇન્ટિગ્રેટેડ ડિફેન્સ સ્ટાફ (HQ IDS) અને હેડક્વાર્ટર સાઉથ વેસ્ટર્ન એર કમાન્ડ (HQ...

Read more

Himesh Reshammiya Cheers for Gujarati comedy ‘Ruff and Tuff Kanya’, Extends His Best Wishes to the T…

Mitwa’ singer Shafqat Amanat Ali Opens Up About Return to Stage & Recordings After Year-Long Battle …

DOSS MUSIC HOSTS GRAND STAR-STUDDED LAUNCH OF “MISS UNIVERSE” IN MUMBAI!

સરથાણા ખાતે ભવ્ય તુલસી વિવાહ મહોત્સવમાં આરોગ્ય રાજ્યમંત્રી શ્રી પ્રફુલ પાનશેરીયાએ ૧૦,૦૦૦ થી વધુ લોકો…

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Call us: 9825191983

© 2024 Satya Samachar

No Result
View All Result
  • HOME
  • INDIA
  • GUJRAT
  • Entertainment
  • Lifestyle
  • Lok Sabha
  • પત્રકાર બનો

© 2024 Satya Samachar

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In